Aurangzeb Controversy : औरंगजेबाचे फोटो झळकण्याला राजकीय वास : सत्यजित तांबे | aurangzeb controversy Satyajit Tambe statement about Showing of Aurangzeb photos is political game nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satyajeet Tambe

Aurangzeb Controversy : औरंगजेबाचे फोटो झळकण्याला राजकीय वास : सत्यजित तांबे

Aurangzeb Controversy : औरंगजेबाचे फोटो अचानक झळकण्याला राजकीय वास असून अशा प्रकारचे प्रयोग हे कर्नाटक राज्यात निवडणुकीपूर्वीदेखील झाले आहेत. किंबहुना असे प्रयोग राजकारण्यांनाच फायदेशीर असतात.

हे लक्षात घेऊन युवकांनीच असे प्रकार रोखण्याची आवश्यकता असल्याचे नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी सांगितले. (aurangzeb controversy Satyajit Tambe statement about Showing of Aurangzeb photos is political game nashik news)

शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीनंतर आमदार तांबे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात सध्या घडत असलेल्या घडामोडी पाहता राज्याचे चित्र चिंताजनक असून, कोल्हापूरसह संगमनेर येथे झालेला प्रकार निंदनीय आहेत.

यात, तरुणांचा वापर स्वार्थासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून केला गेला असल्याचे दिसत आहे. उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला, परंपरेला गालबोट लागू नये, यासाठी तरुणांनीच दक्ष राहण्याची गरज आहे. कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीदेखील असे काही प्रकार घडले होते. सर्वत्र शांतता राहिली पाहिजे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शिक्षणायुक्तांची भूमिका स्वागतार्ह

शिक्षण आयुक्त यांनी राज्यातील शिक्षणाधिकारी यांच्या चौकशीबाबत आमदार तांबे यांनी सांगितले की, शिक्षणाच्या क्षेत्रात उघडकीस आलेल्या भ्रष्टाचाराच्या घटना चिंताजनक असल्या तरी स्वत: शिक्षण आयुक्तांनी त्याबाबत भूमिका घेऊन चौकशीची मागणी करणे स्वागतार्ह आहे. पोलिस आणि महसूल या क्षेत्रामध्ये होणारा भ्रष्टाचार समजू शकतो.

मात्र शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रामध्ये भ्रष्टाचाराची वाढलेली व्याप्ती, थेट रेटकार्ड जाहीर होणे त्रासदायक आहेत. हे प्रकार थांबले पाहिजे, असे तांबे यांनी सांगितले. शिक्षक प्रश्‍नांबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.