Nashik News : उपसरपंच पतीकडून आदिवासी सरपंचांच्या अधिकारावर गदा!

Sarpanch
Sarpanchesakal

नाशिक : धामणी (ता. इगतपुरी) येथील निवडणुकीत सरपंचपदी आदिवासी समाजाचे बन्सी बाळू गोडे यांना तर उपसरपंच म्हणून सरला नारायण भोसले यांची निवड केली आहे.

मात्र सद्यस्थितीत ही पदे नामधारीच असून सरपंच म्हणून नारायण भोसले तर उपसरपंच म्हणून ग्रामपंचायतीचे सदस्य असलेल्या गौतम भोसले हेच गावात मिरवत आहे. (authority of tribal sarpanch snatched from deputy sarpanch husband Nashik News)

यातही या जोडीने धामणी येथे सरपंच प्रेमी शेतकरी महोत्सव व डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचा कार्यक्रमही घेतला. या आदिवासी सरपंचांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.

त्यानुसार सरपंचांच्या स्वभावाचा गैरफायदा घेत गावातील राजकीय नेत्यांनी दहशतीच्या जोरावर स्वत:च्या ताब्यात कारभार घेऊन लोकांची फसवणूक करत आहेत. आपणच सरपंच असल्याचे भासवून ते बैठका घेत आहेत.

त्यातून ग्रामपंचायतीच्या निधीची उधळपट्टी केली जाते. विशेष म्हणजे ग्रामसेवकांना सर्व माहित असतानाही त्यांनी याबाबत वरीष्ठांकडे साधी तक्रार देखील केलेली नाही अथवा त्याबाबतचा अहवालही पाठवलेला नाही.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Sarpanch
Nashik News : औद्योगिक वसाहतीतील गावांतर्गतचे प्रश्न सोडवू : ZP CEO आशिमा मित्तल

त्यामुळे ग्रामसेवकाच्या संगनमताने हा कारभार सुरू आहे. सरपंचांच्या लेटरहेडचा वापर करून देणग्या गोळा करतात. त्याचा कोणत्याही प्रकारचा हिशेब ठेवला जात नाही. हिशेब मागणाऱ्या लोकांवर दहशत निर्माण केली जाते.

ग्रामस्थ दिलीप भोसले, अशोक भोसले, धनंजय भोसले, अक्षय भोसले, भागवत भोसले आदींनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Sarpanch
Nashik News : थकबाकी भरा, अन्यथा पाणीयोजना बंद! वसुलीसाठी ZP प्रशासन आक्रमक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com