NGL26B04089
दोंडाईचा : येथील अहिंसा फार्मसी कॉलेजमध्ये ‘अविष्कार’ स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांसमवेत प्राध्यापक.
------------
दोंडाईचा अहिंसा फार्मसीमध्ये
‘अविष्कार’ स्पर्धा उत्साहात
निमगूळ, ता. ६ : दोंडाईचा येथील अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजला ‘अविष्कार स्पर्धा २०२६’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला, नाविन्यपूर्ण कल्पनांना व वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले.
वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र, शुद्ध विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, कृषी व पशुसंवर्धन स्पर्धेत विविध क्षेत्रांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधन प्रकल्पांचे प्रभावी सादरीकरण केले. स्पर्धेतील विजेत्यांची क्षेत्रनिहाय निवड करण्यात आली. त्यात वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र स्पर्धेत प्रथम किरण पाटील, अदिती पाटील, द्वितीय प्रेरणा सोनवणे, तेजस्विनी पाटील, मोनाली धनगर यांनी यश मिळवले. विज्ञान स्पर्धेत प्रथम चेतना गिरासे, वृषाली धनगर, वैशाली देसले, द्वितीय अंजली बोरसे, निता धनगर, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान स्पर्धेत प्रथम प्रतिक्षा मोरे, स्वाती मोरे, द्वितीय साक्षी पाटील, रुचिता पाटील, कृषी व पशुसंवर्धन स्पर्धेत प्रथम धनश्री गुरव, भाविका गिरासे, द्वितीय पायल परदेशी, रोणक पाटील यांनी यश संपादन केले.
प्रा. डॉ. पल्लवी पिंपळकर, डॉ. शरद सूर्यवंशी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. फार्मसीचे प्राचार्य डॉ. डी. ए. पाटील, उपप्राचार्य डॉ. पी. ए. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अविष्कार स्पर्धा २०२६ पार पडली.