Nashik : प्रस्तावांची जिल्हा परीषद प्रशासनाला प्रतिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

zp-nashik

प्रस्तावांची जिल्हा परीषद प्रशासनाला प्रतिक्षा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सदस्यांच्या वाटेला चालू आर्थिक वर्षात नऊ लाख ७५ हजार रुपयाचा निधी हा येणार आहे. मात्र मागील वर्षाच्या निधीचे कामांचे प्रस्ताव देखील अनेक सदस्यांकडून प्राप्त न झाल्याने मागील नियोजन पूर्ण झालेले नसताना चालू वर्षाचा सेसचा निधी देखील जमा झालेला असल्याने दोन्ही वर्षांच्या संपूर्ण कामांच्या निधीचे नियोजन होण्यासाठी डिसेंबर उजेडणार आहे.

जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून महिला बालकल्याण, समाजकल्याण, शिक्षण, पाणी पुरवठा, सामान्य प्रशासन इतर विभागांना निधी दिल्यानंतर उरलेला निधी हा बांधकाम विभागाकडे वळविला जात असतो. या निधीचे सदस्यांच्या प्रस्ताव व कामांच्या मागणीनुसार नियोजन केले जाते. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे प्रत्येक सदस्याला मिळणाऱ्या २२ लाख रुपये सेसच्या निधीत देखील मोठी कपात झाली असून आता सात लाखांच्या आता आला आहे.

चालू आर्थिक वर्षामध्ये सेसच्या निधीत काहीशी वाढत होत तो सुमारे ९ लाख ७५ हजार रुपयेपर्यंत मिळणार आहे. मागील वर्षाच्या २०२१-२१ च्या सेस निधीसाठी आतापर्यंत केवळ २५ सदस्यांची पत्र प्राप्त झाल्याची माहिती समोर आली असून यामुळे मागील वर्षाच्या स्वीयनिधीतील कामांचे नियोजन अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यानंतर चालू आर्थिक वर्षात निधीसाठी सदस्यांची पत्र कधी येणार, त्यांचे नियोजन कधी होणार, त्यास प्रशासकीय मान्यता कधी होणार? निविदा प्रक्रिया यानंतर कार्यारंभ आदेश होऊन कामे कधी पूर्ण होणार? असा प्रश्‍न आता प्रशासनापुढे उपस्थित झालेला आहे.

ट्रॅक्टरचे अनुदान बांधकामकडे?

जिल्हा परिषद सदस्य यतिंद्र पगार यांनी त्याचा स्वीयनिधी ट्रॅक्टर अनुदानासाठी वापरण्याची परवानगी मागणारा ठराव सर्वसाधारण सभेत केला होता. मात्र, कृषी विभागाच्या विषय समिती सभेने लाभार्थ्यांची नावे मंजूर करताना त्यांची नावे त्यात आली नाही. यामुळे प्रशासनाने त्यांचा स्वीयनिधी कृषी विभागाच्या ट्रॅक्टर अनुदानासाठी वापरता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे त्यांनी त्यांच्या स्वीयनिधीतून पुन्हा रस्ते दुरुस्ती अथवा इतर बांधकामे करण्यासाठी निधी बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे. तशी मागणी देखील करण्यात आलेली आहे.

loading image
go to top