Measles Awarness : गोवरबाबत NMCकडून जनजागृती मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Measles Symptoms

Measles Awarness : गोवरबाबत NMCकडून जनजागृती मोहीम

नाशिक : मुंबईसह नजीकच्या मालेगाव शहरात विद्यार्थ्यांना गोवरची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका हद्दीत या आजाराचा रुग्ण आढळून आल्यास विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, शहरात अद्याप एकही गोवरची लागण झाल्याची केस समोर आलेली नसल्याने तूर्त तरी विद्यार्थ्यांना दिलासा आहे. दरम्यान, महापालिका आरोग्य विभागाकडून या आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मुलांमध्ये काही लक्षणे आढळल्यास पालकांनी घाबरून जाऊ नये, डॉक्टरांना माहिती द्यावी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन उपचाराचे आवाहन करण्यात आले आहे. (Awareness campaign by NMC on Measles Nashik News)

हेही वाचा: Nashik Traffic : भाजी बाजार थेट रस्त्यावर; वाहतूक कोंडीसह अपघातांना आमंत्रण

लक्षणे

गोवरची बाधा कोणत्याही वयोगटात होण्याची शक्यता असते. गोवर झालेल्या व्यक्तीकडून हा आजार अंगावर लाल पुरळ येण्याच्या तीन दिवस आधी आणि चार ते सहा दिवसानंतर दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो. गोवर झालेल्या रुग्णांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अंधत्व येऊ शकते. गोवर सोबत होणारा न्यूमोनिया हा बऱ्याच वेळा तीव्र असतो. यामध्ये रुग्णाच्या श्वसनलिकेला सूज येऊन रुग्णांना श्वसन प्रकियेत त्रास होण्याची शक्यता असते. गोवर झालेल्या रुग्णांमध्ये तीव्र ताप, शरीरावर लाल पुरळ, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसतात.

डोस कधी घ्यायचा?

ज्या बालकांनी या लसीचे दोन डोस ठरवून दिलेल्या वेळेत घेतले आहेत. त्यांना आजार होण्याची शक्यता कमी असते. मात्र, होणारच नाही याची हमी देता येत नाही. तीन टक्के बालकांना लस घेतल्यानंतरही हा आजार होऊ शकतो. ज्या मुलांनी लस घेतलीच नाही किंवा एकच डोस घेतला अशा बालकांना हा विषाणूजन्य आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे बालकांचे वय ९ महिने पूर्ण झाल्यानंतर पाहिला डोस घेण्यास हरकत नाही. दुसरा डोस १६ ते २४ महिने झाल्यावर घेण्यात यावा. तसेच ज्या बालकांचे लसीकरण झाले नसेल तर बालकाचे वय वर्ष पाचपर्यंत असेल तर गोवर रुबेलाचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांनी केले आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : चोरीची रक्कम हस्तगत; मात्र संशयितांची हातावर तुरी!

टॅग्स :NashiknmcMeasles Vaccine