चिकाटी अन सामाजिक बांधीलकी जपत व्यवसायात यश मिळवा डॉ. वंदना पेंडसे : मातोश्री आयुर्वेद महाविद्यालयात पदवीदान समारंभ उत्साहात

चिकाटी अन सामाजिक बांधीलकी जपत व्यवसायात यश मिळवा डॉ. वंदना पेंडसे : मातोश्री आयुर्वेद महाविद्यालयात पदवीदान समारंभ उत्साहात
Published on: 
पान-४ अँकर कृपया आवश्यक फोटो-27335 बाभूळगाव : मातोश्री असराबाई दाराडे आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करताना मान्यवर. चिकाटी, सामाजिक बांधिलकीतून व्यवसायात यश मिळवा डॉ. वंदना पेंडसे : मातोश्री आयुर्वेद महाविद्यालयात पदवीदान समारंभ सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १ : आयुर्वेदाच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य करताना आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम जपा. आपल्या ज्ञानाचा उपयोग उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी करा आणि व्यावसायिक क्षेत्रात यश मिळवताना सेवाभावाला प्राधान्य द्या, असे आवाहन संतोषीमाता आयुर्वेद महाविद्यालय, पन्हाळसाठे येथील प्राचार्या डॉ. वंदना पेंडसे यांनी केले. बाभूळगाव येथील मातोश्री असराबाई दाराडे आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थी पदवीदान समारंभात त्या बोलत होत्या. एसएनडी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम जाधव, मातोश्री असराबाई दाराडे आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील उपस्थित होते. प्रारंभी प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी बीएएमएस पास विद्यार्थ्यांसह एम. एस. शल्यतंत्र तसेच एम. एस. स्त्रीरोग व प्रसूतितंत्र शाखांतील ६२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. उत्तम जाधव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, वैद्यकीय क्षेत्रात ज्ञानाबरोबरच प्रामाणिकपणा, संवेदनशीलता आणि सेवाभाव यांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी पदवीधर विद्यार्थ्यांनी कर्तृत्वातून कुटुंबाचा नावलौकिक वाढवावा, समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे आणि राष्ट्राच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहावे, असा संदेश दिला. उपप्राचार्या डॉ. वर्षाराणी पाटील, डॉ. दीपाली भालेराव आणि डॉ. पल्लवी मेटकरी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ. दीपाली भालेराव, डॉ. किरण पवार, डॉ. वृषाली अवरासे, डॉ. प्रमोद राठोड, श्री. अविक धर आदींनी प्रयत्न केले. .............. कोट पदवीदान समारंभ हा शैक्षणिक यशाचा गौरव असून, नव्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. पदवीनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी करावा. - रूपेश दराडे, संचालक, जगदंबा शिक्षण संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.