पान-३
३०-२
आयुषच्या तिसऱ्या प्रवेश यादीत
५ हजार ९६१ विद्यार्थ्यांना संधी
--
आयुर्वेदमध्ये चार हजार, होमिओपॅथीत सोळाशे विद्यार्थी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.३ ः आयुष वैद्यकीय शिक्षणांतर्गत पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. सहा हजार ६३४ जागा रिक्त असून, त्यासाठी या यादीत राज्यातील ५ हजार ९६१ विद्यार्थ्यांना प्रवेश संधी उपलब्ध केली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक चार हजार प्रवेशोच्छूक आयुर्वेद (बीएएमएस) अभ्यासक्रमाचे आहेत.
---------
आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस) आणि युनानी (बीयुएमएस) या तीन अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या जागावाटपाची तिसरी यादी जाहीर झाली आहे. त्यात तिन्ही अभ्यासक्रमाच्या राज्यात २०४ वैद्यकीय महाविद्यालयात १३ हजार ७५० जागांपैकी ७ हजार ११६ जागेवर पहिल्या व दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रतीक्षेत असलेल्या ५ हजार ९६१ विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीत प्रवेशाची संधी आहे. यानंतरही ६७३ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा स्ट्रे राऊंडसाठी उपलब्ध असतील.
होमिओपॅथीच्या तिसऱ्या यादीत राज्यात ५७ वैद्यकीय महाविद्यालयात ४ हजार ०१९ पैकी १ हजार ८४७ विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला आहे. तिसऱ्या फेरीत १ हजार ६८३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये ४८९ जागा रिक्त आहेत. युनानी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या यादीत राज्यात ८ वैद्यकीय महाविद्यालयात ४२८ जागांपैकी २२८ विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला. तिसऱ्या फेरीत १९३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून सात जागा रिक्त राहात आहेत.
---
आयुर्वेदच्या ५४ टक्के जागांवर प्रवेश
आयुर्वेद (बीएएमएस) अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या यादीत राज्यात उपलब्ध ९ हजार ३०३ जागांपैकी ५ हजार ०४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. साधारणतः ५४ टक्के जागांवर प्रवेश झालेले असताना, तिसऱ्या फेरीत ४ हजार ०८५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये १७७ जागा रिक्त आहेत. सहा शासकीय महाविद्यालयात ३२९, शासकीय अनुदानित/ महापालिकेच्या १७ महाविद्यालयात ८६० व विनाअनुदानित ११६ महाविद्यालयात २८९६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची मिळाली संधी आहे.
----
इन्फोः
प्रक्रिया पूर्ततेची आज मुदत
तिसऱ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात बुधवारी (ता.४) सायंकाळी साडेपाचपर्यंत आवश्यक मूळ कागदपत्र व शुल्क (धनाकर्षाद्वारे) प्रत्यक्ष उपस्थित राहून जमा करायचा आहे. व प्रवेश निश्चित करायचा आहे.
----------