''आयुष''च्‍या ८४ टक्‍के जागांवर प्रवेश

''आयुष''च्‍या ८४ टक्‍के जागांवर प्रवेश
Published on: 
‘आयुष’च्‍या ८४ टक्‍के जागांवर प्रवेश --- आयुर्वेद ८७.६२ टक्‍के, होमिओपॅथी ७५.६९, युनानी ९२.९९ टक्‍के जागा भरल्‍या सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ८ ः आयुष वैद्यकीय शिक्षणाअंतर्गत असलेल्या पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी तीन फेऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तिसऱ्या फेरीअखेर आयुष अभ्यासक्रमांच्‍या राज्यातील २०४ वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्‍ध १३ हजार ७५० पैकी ११ हजार ५९२ जागांवर प्रवेश झाले आहे. हे प्रमाण ८४.३० टक्‍के आहे. रिक्‍त जागांवर प्रवेशासाठी पुढील वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. -------------- तिसऱ्या फेरीअखेर एकूण २ हजार १५८ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा पुढे स्ट्रे राऊंडसाठी उपलब्ध असतील. दरम्‍यान अभ्यासक्रमनिहाय आकडेवारीचे विश्‍लेषण केल्‍यास आयुर्वेद (बीएएमएस) चे ८७.६२ टक्‍के प्रवेश झाले आहे. राज्यातील १३९ आयुर्वेद महाविद्यालयामध्ये उपलब्‍ध एकूण ९ हजार ३०३ पैकी ८ हजार १५२ जागा भरल्या आहेत. १ हजार १५१ जागा रिक्त आहेत. २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बीएएमएसच्या १ हजार ६७२ पैकी १ हजार ५४७ म्हणजे ९२.५२ टक्‍के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. ११६ खासगी वैद्यकीय महाविद्यालयात बीएएमएसच्या उपलब्‍ध ७ हजार ६३१ पैकी ६ हजार ६०५ जागांवर प्रवेश झाले असून, १ हजार ०२६ जागा रिक्त आहेत. १६-१ चौकट युनानीचे ९३ टक्के जागांवर प्रवेश बीएचएमएसमध्ये राज्यातील ५७ होमिओपॅथी महाविद्यालयामध्ये एकूण ४ हजार ०१९ जागांपैकी ३ हजार ०४२ म्हणजे ७५.६९ टक्‍के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून ९७७ जागा रिक्त आहेत. युनानी अभ्यासक्रमात (बीयूएमएस) राज्यात आठ युनानी महाविद्यालयांमध्ये एकूण ४२८ पैकी ३९८ म्हणजे ९२.९९ टक्‍के जागांवर प्रवेश झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.