Ayushman Bharat Digital Mission
sakal
नाशिक: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. ई-सुश्रुतच्या १५ पैकी १५ मॉड्यूल्सची प्रभावी अंमलबजावणी करून रुग्णालयाने १०० टक्के कागदविरहित (पेपरलेस) कामकाज साकारले. त्यामुळे रुग्णसेवा अधिक वेगवान, पारदर्शक आणि कार्यक्षम झाली आहे.