Azadi ka Amrit Mahotsav 2022 : शहरात प्रभातफेरींनी स्वातंत्र्योत्सवाची लहर

azadi ka amrit mahotsav 2022 students rally on golf club ground
azadi ka amrit mahotsav 2022 students rally on golf club groundesakal

नाशिक : देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेतर्फे शुक्रवारी (ता. १२) शहरातून शालेय विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली. जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभाग नोंदविला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. गोल्फ क्लब मैदानावर रॅलींचा समारोप झाला. (Azadi ka Amrit Mahotsav 2022 Wave of Independence Day with Prabhatferi in city nashik Latest Marathi news)

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत स्वराज्य महोत्सव जनजागृतीसाठी महापालिकेतर्फे ९ ऑगस्टपासून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून शुक्रवारी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, नाशिक महापालिका आणि विविध खेळांच्या संघटनांतर्फे शहरातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.

त्यामुळे संपूर्ण शहरात देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले. रॅलीत ढोल पथक, झांज पथक, लेझीम पथक, स्काऊट पथक, गाईड पथक, सैनिकी शाळेचे पथक सहभागी झाले होते. विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा केली होती.

खासगी ४५ व महापालिकेच्या १२ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. उंटवाडी येथील पेठे हायस्कूलमध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी महापाकिलेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या रॅलीला हिरवा झेंडा दाखविला.

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, रावसाहेब थोरात सभागृह, शिवसत्य क्लब सहदेवनगर, विद्या प्रबोधिनी, न्यू इरा स्कूल गोविंदनगर, एम. एस. कोठारी हायस्कूल, श्रीराम विद्यालयातून प्रभातफेरींना सुरवात झाली.

ढोल-ताशांचा गजर व झांज लेझीम पथकांनी वातावरणनिर्मिती केली. खासगी शाळांमधील तीन हजार ५०० आणि महापालिकेच्या १२ शाळांमधील एक हजार विद्यार्थी, असे एकूण मिळून साडेचार हजार विद्यार्थ्यांचा प्रभातफेरीत सहभाग होता.

संबळ वाद्य, झांज पथक, झेंडा पथक प्रमुख आकर्षण होते. देशभक्तीपर नृत्यही सादर करण्यात आले. भोसला सैनिकी स्कूलचे विद्यार्थी सैनिकी गणवेशात आणि बँड पथकासह सहभागी झाले होते.

azadi ka amrit mahotsav 2022 students rally on golf club ground
MVP Election : 6 उमेदवारी अर्ज बाद; 4 उमेदवार निवडणूक रिंगणातून बाहेर

गोल्फ क्लब मैदानावर समारोप

केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर (गोल्फ क्लब) प्रभातफेरींचा समारोप झाला. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, क्रीडाधिकारी अविनाश टिळे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, महापालिकेच्या शिक्षण प्रशासन अधिकारी सुनीता धनगर व अधिकारी उपस्थित होते.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केले. येणाऱ्या वर्षांत देशाला बलशाली बनविण्यासाठी तयार केलेल्या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. दानवे यांनी केले.

azadi ka amrit mahotsav 2022 students rally on golf club ground
नाशिक : सिडकोत वृक्ष कोसळला; थोडक्यात वाचली स्कुल व्हॅन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com