पान-३--ॲंकरही चालेले
---------------
YEO26B27495
बाभूळगाव : राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी प्राचार्य जी एस येवले व शिक्षक.
-------------
३६-५
बाभूळगावच्या श्लोक काठेची राष्ट्रीय स्तरासाठी निवड
----------
संतोष विद्यालयाचे तलवारबाजीत राज्यस्तरावर यश; सहा विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड
-----------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१४ : बाभूळगाव येथील एस. एस. एम. विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील अकरावीचा विद्यार्थी खेळाडू श्लोक काठे याने तलवारबाजीत राज्यस्तरावर विजय संपादन केले. त्याची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाल्याने विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
राज्यस्तरीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे झाल्या. नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरासाठी निवड मिळवली आहे. या स्पर्धेत श्लोक काळे याने १९ वर्षांखालील लांब उडी व तिहेरी उडी या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवला. सागर आहेर याने १९ वर्षांखालील भालाफेकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. रिजवान शेख याने १७ वर्षांखालील गोळा फेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. ओम तपपुरे याने १९ वर्षांखालील ११० मीटर हर्डल्समध्ये तृतीय क्रमांक, आकांक्षा पेंढारी हिने १९ वर्षांखालील ४०० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक, तर गायत्री चव्हाण हिने १९ वर्षांखालील ८०० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक मिळवला.
या सर्व खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांच्या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यालयाचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल झाले आहे.
संस्थेचे अध्यक्ष,आमदार किशोर दराडे, संचालक रुपेश दराडे, सिद्धांत दराडे तसेच प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे, समन्वय सुनील पवार आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक जी. एस. येवले, उपप्राचार्य ए. जी. कदम, विभाग प्रमुख व्ही. आर. परदेशी, किरण पैठणकर आदींनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक सागर मुटेकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
-------------------