येवला: निवडणूक आयोग तुमचा मित्र झाल्यामुळे तुम्हाला मस्ती आली असून, हे सर्व ईव्हीएम मशिनचे पहिलवान आहेत. ईव्हीएम व ‘ईडी’चा प्रकार भाजपने ताब्यात घेतलेल्या संस्था आहेत, त्यांचा जसा म्हणाल तसा वापर सुरू असून, संविधानाची चिरफाड सुरू आहे. ते म्हणतात लोकशाही आहे, मात्र ही भाजपची हुकूमशाही राहणार, अशी अवस्था आणून ठेवली आहे, अशा शब्दांत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारवर प्रहार करत जहरी टीका केली.