Dada Bhuse
sakal
नाशिक: बदलापूर येथे विद्यार्थिनीवर झालेली अत्याचाराची घटना दुर्दैवी असून, या प्रकरणातील नराधमावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. राज्यात वाढत असलेल्या बालकांवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या संरक्षणासाठी नवा कडक कायदा लागू करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.