आजपासून बॅडमिंटन स्पर्धा

आजपासून बॅडमिंटन स्पर्धा
Published on: 
‘विद्यावर्धिनी’त उद्यापासून बॉल बॅडमिंटन स्पर्धा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १२ ः येथील साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या मैदानावर १४ नोव्हेंबरपासून खुल्या गटाच्या बॉल बॅडमिंटन लीग स्पर्धा होणार आहे. शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र, जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशन आणि विद्यावर्धिनी महाविद्यालयातर्फे ही स्पर्धा होईल. जिल्ह्यात तब्बल १० ते १२ वर्षांनंतर खुल्या गटाची बॉल बॅडमिंटन स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा लीग पद्धतीने खेळविली जाणार असून, याद्वारे युवा व होतकरू खेळाडूंना आपले क्रीडागुण दाखविण्याची संधी मिळावी आणि त्यांना प्रोत्साहन लाभावे, हा आयोजकांचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेत धुळे जिल्ह्यासह नंदुरबार, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, कन्नड आणि चाळीसगाव येथील संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील अंतिम तीन विजयी संघांना आकर्षक करंडकासह विविध वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी भालचंद्र सोनागत (मो. ७०३८२ ७७०००), राजेश खोपे, शिरीष सूर्यवंशी, जय शहा, साहिल कुरेशी (८५५१० ७५५९५) यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेला प्रा. भिकाजी बोरसे, प्रा. व्ही. एल. पाटील, प्रा. कैलास बोरसे, जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष नितीन भामरे, महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे सहसचिव परेश उपकारे, प्रा. नरेश बागल, टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव संदीप शिंदे, प्रा. नितीन वालके, प्रा. पल्लवी वालके मार्गदर्शन करतील, असे शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्राचे अध्यक्ष भालचंद्र सोनागत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.