Bageshwar Maharaj Controversy : वारकरी संप्रदायातर्फे बागेश्‍वर बाबाचा निषेध

Bageshwar Maharaj controversy
Bageshwar Maharaj controversyesakal
Updated on

नाशिक : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या चमत्कारी बाबा बागेश्‍वर यांचा नाशिकमधील वारकरी संप्रदायाने तीव्र निषेध केला आहे. (Bageshwar Maharaj Controversy Condemnation of Bageshwar Baba by Warkari samaj nashik news)

हेही वाचा :....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

Bageshwar Maharaj controversy
Muslim Marathi Sahitya Sammelan | मुस्लिमांनो, फूट पडू देऊ नका! : हुसेन दलवाई यांचे आवाहन

याबाबत त्र्यंबकेश्‍वर येथील संत निवृत्तीनाथ संजीवन समाधी मंदिराचे विश्‍वस्त व प्रसिद्धी प्रमुख प्रा. अमर ठोंबरे यांच्यासह अनेकांनी निषेध केला आहे. बागेश्‍वर बाबा सुरवातीपासूनच वादग्रस्त असल्याचे सांगून त्याला काही पक्ष अभय देत असल्याचे प्रा. ठोंबरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तथाकथित धर्मगुरू व चमत्कारी बाबाला त्वरित अटक करून गुन्हा दाखल करावा, अन्यथा वारकरी संप्रदायातर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही श्री. ठोंबरे यांनी दिला आहे. जगद्गुरू तुकोबाराय हे अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असून खऱ्या अर्थाने संत शिरोमणी आहेत. त्यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागावी, अन्यथा वारकरी संप्रदायातर्फे त्यांच्या विरोधात राज्यभर गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही प्रा. ठोंबरे यांनी दिला आहे.

"बागेश्‍वर बाबाने जगद्गुरू तुकोबारायांबाबत वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला आहे. या ढोंगी बाबाचे काही ठराविक पक्षातील लोक पाठराखण करत असल्याने त्याचे धाडस वाढले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करावा."

- ॲड. सोमेश्‍वर घोटेकर, सचिव, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ संजीवन समाधी ट्रस्ट

Bageshwar Maharaj controversy
Nashik News : त्र्यंबकेश्‍वरमध्ये लॉजिंगची झाडाझडती; नियमित तपासणी असल्याचा पोलिसांचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com