

Nashik
esakal
अंबासन: बागलाण तालुक्यातील आखतवाडे (ता. बागलाण) येथे शेतकरी दांपत्यावर संशयित विषबाधेचे संकट ओढवले आहे. दिवसभर शेतीची कामे आटोपल्यावर कुटुंबासमवेत मटणाचे जेवण केल्यावर रात्री दोघांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच द्वारकाबाई शांताराम ह्याळीज (वय ६८) यांचा मृत्यू झाला; तर पती शांताराम नानाजी ह्याळीज (७८) यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.