बागलाणमधील ठेकेदारांची कोट्यवधीची देयके प्रलंबित

बागलाणमधील ठेकेदारांची कोट्यवधीची देयके प्रलंबित
Published on: 
बागलाणमधील ठेकेदारांची कोट्यवधीची देयके प्रलंबित ----------------------- मुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे सकाळ वृत्तसेवा नामपूर, ता. १५ : गेल्या अनेक महिन्यांपासून बागलाण तालुक्यातील विविध गावांमध्ये शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाच्या कामाची कोट्यवधी रुपयांची बिले प्रलंबित आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकामी लक्ष घालून ठेकेदारांना न्याय द्यावा, अशी मागणी तालुक्यातील ठेकेदारांनी केली आहे. कोट्यवधी रुपयांची देयके अनेक महिन्यांपासून अडकून पडल्याने बागलाणमधील विकासकामांना खीळ बसल्याचे वास्तव आहे. भौगोलिकदृष्ट्या विकासाने मोठा असलेला बागलाण तालुका विकासाच्या वाटेवर आहे. बागलाणमधील रस्ते, पूल, सार्वजनिक पाणीपुरवठा जलजीवन योजनांची कामे मोठ्या प्रमाणावर आहेत. अनेक गावांमध्ये विकासकामांसाठी लोकप्रतिनिधीकडे साकडे घातल्यानंतर निधी उपलब्ध नसतानाही विकासकामे मार्गी लावली जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू होती. बागलाणमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे ठेकेदारांमार्फत सुरू आहेत. तालुक्यातील शेकडो ठेकेदारांच्या माध्यमातून तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत असलेले रस्ते, राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, यासह आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग, घरकुले, जलजीवन प्राधिकरणाची कामे सुरू आहेत. मात्र, या कामांना आता ग्रहण लागले आहे. जलजीवनचीदेखील कामे ठप्प झाल्याने तालुक्यात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. कोट... बागलाण तालुक्यासाठी टी ६ अंतर्गत सुमारे साडेतीनशे कोटींचा निधी अद्याप प्रलंबित आहे. तसेच, जलजीवन मिशन अंतर्गत रेट्रोफिटिंगची सुमारे ४० कोटींची कामे पूर्ण होऊनही गेल्या दोन वर्षांपासून संबंधित निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कंत्राटदार, कामगार आणि संबंधित यंत्रणांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने प्रलंबित निधीचे तातडीने वितरण करावे. - सुरज देवरे, ठेकेदार, नामपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.