

Declare Baglan drought-hit, demands Deepika Chavan.
Sakal
सटाणा : बागलाण तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. जूनमध्ये अवघे चार ते पाच दिवस पाऊस झाल्यानंतर तब्बल ३० ते ४० दिवसांच्या प्रदीर्घ खंडामुळे जमिनीतील ओलावा घटला असून मका, बाजरीसह कांदा पिकांची वाढ खुंटली आहे. पावसाची स्थिती अशीच राहिल्यास हातातोंडाशी आलेली पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे बागलाण तालुका तातडीने दुष्काळी जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या, अशी मागणी माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केली आहे.