Agriculture News : काटवन ते नांदीनपर्यंत गारपिटीचा हाहाकार; हातातोंडाशी आलेला घास हिरावला, बळीराजा संकटात

Unseasonal Hailstorm Hits Baglan Taluka : पश्चिम आदिवासी भागासह मुल्हेर, अंतापूर, पिंपळकोठे ,भडाणे, दसवेल शिवारात सलग दुसऱ्या दिवशी बेमोसमी गारांचा पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
crop damage

crop damage

sakal

Updated on

अंतापूर: बागलाण तालुक्यात पश्चिम आदिवासी भागासह मुल्हेर, अंतापूर, पिंपळकोठे ,भडाणे, दसवेल शिवारात सलग दुसऱ्या दिवशी बेमोसमी गारांचा पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मुल्हेर, मुंगसे, नरकोळ, जाखोड, विजयनगर, मोराणे, पिंगळवाडे, शेवरे, ताहाराबाद, दसवेल, पिंपळकोठे, भडाने, सोमपूर तसेच जायखेडा ,आसखेडा, गोराणे, नामपुर, खिरमाणी, कुपखेडा परिसरात गारांचा पाऊस झाल्यामुळे कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो इत्यादी पिके व आंबा, चिकूचे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com