Crime
sakal
सटाणा: बागलाण तालुक्यातील दऱ्हाणे व ब्राह्मणगाव शिवार परिसरात गौण खनिज वाळूचोरीचे दोन वेगवेगळे प्रकार उघडकीस आले असून, या दोन्ही घटनांमध्ये चालकांनी ट्रॅक्टर-ट्रॉली घटनास्थळीच सोडून पळ काढल्याचे समोर आले आहे. या दोन्ही प्रकरणी सटाणा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केल्या आहेत.