Baglan Gram Panchayat
sakal
सटाणा: बागलाण तालुक्यातील स्थानिक स्वराज्य व्यवस्थेला हादरा देणारी प्रशासकीय कारवाई करत जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील ८५ ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवले आहे. राखीव जागांसाठी निवडून आलेल्या या सदस्यांनी शासनाने दिलेल्या अंतिम मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ही कारवाई अनिवार्य ठरली. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या कारभारावर याचा थेट परिणाम होणार आहे.