सटाणा- बागलाण विधानसभा मतदार संघातील आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यासाठी पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले असून राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पंधराव्या वित्त आयोगातून दहा प्राथमिक उपकेंद्रांसह एका आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतींसाठी सुमारे १० कोटीचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच ही कामे पूर्णत्वास जातील. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अधिक चांगली आरोग्यसेवा उपलब्ध होईल अशी माहिती बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी दिली.