वडनेरभैरव- बहादुरी (ता. चांदवड) येथील पस्तीसवर्षीय कल्याणी संतोष शिरसाठ या विवाहितेने शनिवारी (ता. १९) त्यांच्याच विहिरीत आत्महत्या केली. पती व सासरच्यांकडून सतत चारित्र्यावर संशय घेत तिचा छळ होत असल्यानेच तिने हे कृत्य केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला. बहादुरी येथे तिच्या सासरच्या घरासमोरच माहेरच्यांनी अंत्यविधी केल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी पती संतोषला ताब्यात घेतले आहे.