Baipan Bhari Deva Movie: ‘बाईपण भारी देवा’ ने उडविली धूम! ग्रुपने एकाच वेशभूषेत जात महिला घेताहेत आनंद

Women flock to watch the movie 'Baipan Bhari Deva' in the city
Women flock to watch the movie 'Baipan Bhari Deva' in the cityesakal
Updated on

Baipan Bhari Deva Movie : माहेरची साडी तसेच अनेक कौटुंबिक चित्रपटानंतर महिलांच्या पसंतीस पडलेला ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

अनेक थिएटरबाहेर महिलांना पोस्टरसोबत सेल्फी घेताना दिसत आहेत. मुलीपासून तर सूनबाई, आजी सासूबाई, आतेबहिणी अशा सर्वांच्या पसंती उतरलेल्या या चित्रपटासाठी महिलांचे खास शोच सुरू झाले आहेत. (Baipan Bhari Deva movie blew up group of women enjoy going in same attire nashik)

केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. विशेषतः महिला वर्गाचा या चित्रपटाला छप्परफाड प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटासाठी एकाच वेशभूषेत समुहाने थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचे लोण शहरात पसरले आहे. चित्रपट संपल्यानंतर स्क्रीनसमोर पिंगा घातला जात असून त्याचे फोटो व व्हिडिओ स्टेटसवर ठेवले जात आहेत.

मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाहीत, अशी सार्वत्रिक तक्रार आहे. पण, चित्रपट आशयप्रधान व वेगळ्या धाटणीचा असेल तर नक्कीच गर्दी खेचतो. 'बाईपण भारी देवा'नेही हेच दाखवून दिले आहे.

पाच कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने तीन आठवड्यातच कोट्यवधींचा गल्ला जमवलाय. हा चित्रपट शहरात व शहराबाहेर प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले आहेत. पहिल्या आठवड्यात चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Women flock to watch the movie 'Baipan Bhari Deva' in the city
Baipan Bhari Deva: "एव्हढा काय चांगला पिच्चर नाही..", चित्रपट समीक्षकाची 'बाईपण भारी देवा' सिनेमासाठीची पोस्ट चर्चेत

पण, प्रोमोज व ट्रेलर पाहून थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. व्हॉट्स अॅप ग्रुपमुळेही चित्रपटाची प्रसिद्धी होत आहे. शहरातील दोन थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

महिलांची वाढती गर्दी पाहून एका हाउसफुल चे बोर्ड चित्रपट बाहेर लावले जात आहे यावरुन या चित्रपटाची क्रेझ लक्षात यावी...

हा चित्रपट सहा बहिणींवर बेतला आहे. चित्रपट पाहताना स्वतःचे घर आठवते. हा चित्रपट खूप हसवतो अन् तितकेच रडवतोही.

आम्ही बारा जणींनी एकत्र जाऊन हा चित्रपट एन्जॉय केला. कधीही कुठेही न येणाऱ्या महिला चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आल्या असे मत गृहिणींनी व्यक्त केले.

Women flock to watch the movie 'Baipan Bhari Deva' in the city
Baipan Bhari Deva : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे मोठे होर्डिंग जर लावण्यात आले नाही तर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.