चंद्रदर्शनाची साक्ष मिळाल्याने रविवारी 10 जुलैला बकरी ईद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bakari Eid

चंद्रदर्शनाची साक्ष मिळाल्याने रविवारी 10 जुलैला बकरी ईद

जुने नाशिक : मुंबई येथून चंद्रदर्शन झाल्याची साक्ष मिळाल्याने पुढील आठवड्यातील रविवारी (ता. १०) बकरी ईद (bakari eid) साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती शहर- ए- खतीब हिसमोद्दीन खतीब यांनी दिली. त्यानिमित्ताने मुस्लिम बांधव ईदच्या तयारीस लागले आहे. (bakari Eid on Sunday 10th nashik news)

इस्लामिक कालगणनेनुसार गुरुवारी (ता. ३०) उर्दू जिलकादा महिन्याची २९ तारीख होती. त्यानुसार चंद्रदर्शन होणे अपेक्षित होते. परंतु, दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणामुळे शहरात कुठेही चंद्रदर्शन होऊ शकले नाही. त्यामुळे शहरातील चाँद कमिटीने मुंबई येथून चंद्रदर्शन झाले किंवा नाही या संदर्भातील माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. शनिवारी (ता .२) सायंकाळच्या सुमारास चाँद कमिटीस मुंबई येथून चंद्रदर्शन झाल्याची साक्ष प्राप्त झाली. गुरुवारी चंद्रदर्शन झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार शुक्रवार (ता. १) पासून उर्दू जिलहज महिन्यास सुरवात झाली. शनिवारी (ता. २) उर्दू जिलहज महिन्याची २ तारीख असून, रविवारी (ता. १०) बकरी ईद साजरी होणार असल्याचे चाँद कमिटीचे अध्यक्ष शहर- ए- खतीब हिसमोद्दीन खतीब यांनी सांगितले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गोल्फ क्लब ईदगाह मैदान येथे सकाळी ईदची नमाज होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील विविध मशिदीमध्ये चंद्रदर्शन झाल्याची माहिती देण्यात आली. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना चाँद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ईदच्या आवश्यक खरेदीस त्यांच्याकडून सुरवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यागाचे प्रतीक म्हणून बकरी ईद साजरी केली जाते. ईदसह तीन दिवस कुर्बानी करण्याची प्रथा आहे.

हेही वाचा: Nashik : आयुक्तालयातील 90 जमादार झाले फौजदार

बाजारपेठ गजबजणार

बोकड खरेदी करण्यासाठी रविवार (ता. ४) पासून बाजारात लगबग सुरू होणार आहे. ठिकठिकाणी व्यवसायिकांकडून बोकड बाजार भरविला जातो. अशाच प्रकारचे चित्र सध्या बघावयास मिळणार आहे. दरम्यान, चिमुकल्यांना नवीन कपडे खरेदीसाठीदेखील बाजारात गर्दी होण्याची शक्यता आहे. मुस्लिम बांधवांकडून महापालिका, पोलिस प्रशासनाकडून घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून कुर्बानीचा विधी पार पाडावा, असेही सांगण्यात आले. सोशल मीडियावरही चाँद मुबारकचे संदेश झळकताना दिसले.

हेही वाचा: सीपेट प्रकल्पाला भुजबळांकडून खोडा; खासदार हेमंत गोडसे यांचा आरोप

Web Title: Bakari Eid On Sunday 10th Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikfestivalBakari Eid