रथोत्सव महाप्रसाद वाटप

रथोत्सव महाप्रसाद वाटप
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी.. अँकर -- फोटो क्रमांक : 33354 धुळे : श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सवानिमित्त भाविकांना महाप्रसाद वाटप करताना ओमप्रकाश अग्रवाल. शेजारी गजेंद्र अंपळकर, अल्पा अग्रवाल आदी. -- धुळ्यात बालाजी रथोत्सवानिमित्त महाप्रसाद, रसवाटप -- ‘व्यंकटरमणा गोविंदा’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय; भाविकांचा प्रतिसाद सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २३ : श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सवानिमित्त शहरात भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक व सेवाभावी उपक्रम झाले. या निमित्ताने महाप्रसाद व उसाच्या रसाच्या वाटपाला भाविकांनी प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसर ‘व्यंकटरमणा गोविंदा, गोपाळा गोपाळा’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. दरवर्षीच्या परंपरेनुसार आमदार अनुप अग्रवाल यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी भेट देऊन सहभाग नोंदविला. या वेळी ओमप्रकाश अग्रवाल आणि ‘बेटी बचाव, बेटी पढावो’ अभियानाच्या प्रदेश संयोजक अल्पा अग्रवाल यांच्यासह जिल्हाध्यक्षांनी भाविकांना महाप्रसाद वाटप केला. भाजपचे सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल, सामाजिक कार्यकर्ते विक्की परदेशी, नगरसेवक रोहित चांदोडे, जयेश वावदे, कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सागर कोडगीर, माजी नगरसेविका मंगला पाटील, ॲड. किशोर जाधव, एबी फाउंडेशनचे अध्यक्ष कमलेश देवरे, विक्की सोनार, नगरसेवक भटू ठाकरे, किरण अहिरे, संतोष परदेशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. - उसाच्या रसाचे वाटप यासोबतच पाटील प्रतिष्ठानच्या वतीने अग्रवाल भवन येथे महाप्रसादाचे वाटप झाले. महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुवर्णा पाटील, माजी मंडळ अध्यक्ष ईश्‍वर पाटील, दीपक पाटील आणि गणेश पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडला. या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अंपळकर यांनी भेट देऊन संवाद साधला. प्रशांत चौधरी, पैलवान बाळू गवळी, चेतन सोनार, अरुण दुसाने, प्रशांत मोदी, सुशील वर्मा, उज्ज्वल पगार, यश वाघ, प्रसाद बाविस्कर उपस्थित होते. माजी महापौर तथा नगरसेविका कल्पना महाले आणि नगरसेवक धीरज परदेशी यांच्या वतीने उसाच्या रसाचे वाटप केले. जिल्हाध्यक्ष अंपळकर यांनी या उपक्रमालाही भेट देऊन भाविकांशी संवाद साधला. लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या पुढाकारामुळे रथोत्सवाला सेवाभावी स्वरूप प्राप्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com