वरचे गावात आजपासून
बालाजी मंदिराचा वहनोत्सव
शिरपूर, ता. १० : येथील दीडशे वर्षांपेक्षा अधिक परंपरा असलेल्या वरचे गाव श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या वहनोत्सवाला आज (ता. ११) पासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष शरदकुमार अग्रवाल यांनी दिली. २१ ऑक्टोबरपर्यंत वहनोत्सव साजरा करण्यात येणार असून, २३ ऑक्टोबरला संस्थानचा मुख्य रथोत्सव साजरा केला जाणार आहे. शिरपूरला दोन रथोत्सवांची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा असून गेल्या दीडशे वर्षापेक्षा अधिक काळ हे उत्सव साजरे केले जात आहेत. वरचे गाव बालाजी संस्थानचा रथोत्सव हा मानाचा समजला जातो. मुख्य रथोत्सवापूर्वी वहनांची मिरवणूक निघते. यंदाच्या वहनोत्सवात रविवारी हत्ती, सोमवारी चंद्र, मंगळवारी मारुती, बुधवारी नाग, गुरुवारी गरुड, शुक्रवारी मोर, शनिवारी वाघ, १८ ऑक्टोबरला सूर्य, १९ ऑक्टोबरला सिंह, २० ऑक्टोबरला हरिण तर २१ ऑक्टोबरला घोडा या वहनांची रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. रथोत्सव आणि वहनोत्सवासाठी संस्थानचे अध्यक्ष शरदकुमार अग्रवाल, कार्याध्यक्ष झेंडूसिंह पाटील, उपाध्यक्ष दिलीप लोहार, उत्तमराव माळी, चिटणीस शामकांत ईशी, सहचिटणीस भूपेश अग्रवाल, कोशाध्यक्ष विशाल माहेश्वरी, सहकोशाध्यक्ष किरण दलाल व विश्वस्त प्रयत्नशील आहेत.