पान तीन
-----------------
23560, 27550
सिन्नर : बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना राजाभाऊ वाजे, ज्ञानेश्वर गाढे, प्रवीण गडाख, सोमनाथ तुपे, मनोज देशमुख, पंकज मोरे, शुभम वारुंगसे, रावसाहेब आढाव आदी. दुसऱ्या छायाचित्रात येवला शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना पदाधिकारी व शिवसैनिक.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे
यांना येवला, सिन्नरमध्ये अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
येवला, सिन्नर, ता.१७ : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त सिन्नर आणि येवला येथे अभिवादन करण्यात आले.
येवला येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या वतीने प्रतिमेस हार अर्पण करण्यात आले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्सीम त्यागाने महाराष्ट्र व मराठी माणुस आज ताठ मानेने जगत असल्याचे प्रतिपादन यावेळी उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे यांनी केले. तालुका प्रमुख छगन आहेर यांनी महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जडणघडणीत बाळासाहेबांचे योगदान मोठे असल्याचे सांगत जाती धर्माचा विचार न करता निष्ठावंत कार्यकर्त्यांना शिवसेनेत मानाचे स्थान बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्यानेच सांगितले.
यावेळी शहरप्रमुख लक्ष्मण गवळी, युवासेना तालुका प्रमुख संतोष गोरे, नितीन संसारे, विठ्ठलराव महाले, रावसाहेब नागरे, पंकज नळे, श्रीपाल मंडलेचा, प्रतीक जाधव, रामकृष्ण निकम,ज्ञानदेव मढवई, प्रमोद पाटसकर, दौलत घुगे, बबन कोकाटे , सुखदेव भोरकडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन संसारे यांनी केले.
-----------------
सिन्नरला प्रतिमापूजन
सिन्नर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला. खासदार वाजे यांच्या संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाढे, युवा तालुकाप्रमुख प्रवीण गडाख, सोमनाथ तुपे, गटनेते मनोज देशमुख, पाणी पुरवठा सभापती पंकज मोरे, नगरसेवक शुभम वारुंगसे, बनू पगार, अमोल कासार, खरेदी विक्री संघाचे संचालक रावसाहेब आढाव, बाजार समितीचे संचालक जालिंदर थोरात, केशव कोकाटे, अप्पा पवार, शरद माळी उपस्थित होते.