Bamboo Movie : ‘मी तुला त्या नजरेनं पाहिलंच नाही...’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bamboo Marathi Movie Press Meet

Bamboo Movie : ‘मी तुला त्या नजरेनं पाहिलंच नाही...’

नाशिक : चित्रपटाचे शीर्षक किंवा टॅगलाइन वाचताक्षणी हा खट्याळ विनोदी चित्रपट असावा का, अशी उत्सुकता ताणणारा अन्‌ तितक्याच तरलतेने आजच्या तरुणाईला एक संवेदनशील संदेश देणारा ‘बांबू’ हा चित्रपट येत्या २६ जानेवारीला रसिक मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

विशेषत: मध्यमवयीन ‘तरुणां’नाही भूतकाळात घेऊन जाणारे ‘मी तुला त्या नजरेनं...’ हे धमाल गाणं सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत असल्याने उत्सुकता शमविण्यासाठी सर्वांनी हा चित्रपट आवर्जून बघावा, असे आवाहन चित्रपटाची निर्माती व प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी येथे केले.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गुरुवारी (ता. १२) नाशिकमध्ये आलेल्या टीमने ‘सकाळ’ला भेट देत तनिष्का भगिनींशी मुक्त संवाद साधला. त्या वेळी त्या बोलत होत्या. दिग्दर्शक विशाल देवरूखकर, अभिनेता अभिनय बर्डे, पार्थ भालेराव आणि अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर उपस्थित होते. ‘सकाळ- तनिष्का’ व्यासपीठाचे जिल्हा समन्वयक विजयकुमार इंगळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. (Bamboo Marathi Movie Actor press meet talking with sakal and Tanishka group ladies Nashik News)

हेही वाचा: Nashik News : महा-ई-सेवा केंद्राचा परवाना वर्षासाठी रद्द

‘बांबू लागणे’ असा एक वाक्‌प्रचार आपल्या मराठीत प्रसिद्ध आहे. किंचित चावटपणाकडे अंगुलिनिर्देश करणारा हा वाक्‌प्रचार प्रत्येकानेच अनुभवलेला असतो. या टीमसोबत काम करताना खूप धमाल आल्याचे सांगून तेजस्विनी म्हणाल्या, की अतिशय उत्तम मांडणी असलेला ‘बांबू’ प्रेक्षकांना नक्की आवडेल. दिग्दर्शक श्री. देवरूखकर म्हणाले, की खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला, की कोणाचा तरी खांदा हा लागतोच.

हे बांबूच लागू नयेत आणि तुमचे गेलेले प्रेम यू टर्न मारून परत येण्यासाठी प्रेमाचे सायन्स पाळणे खूप गरजेचे आहे. तरुणाईला समोर ठेवून या चित्रपटाची निर्मिती केलेली असली, तरी तरुणांनी आपल्या पालकांसोबत हा चित्रपट पाहावा, असा आहे.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

हेही वाचा: Nashik News : अट्टल घरफोड्या जेरबंद; 11 घरफोड्यांची कबुली

प्रेमात बांबू कसे लागतात, याची गोष्ट सांगणारा बांबू हा चित्रपट आपण आवर्जून बघावा, असे आवाहनही त्यांनी केले. अभिनय, पार्थ व वैष्णवी यांनीही चित्रपट निर्मिती काळातील आपले अनुभव सांगितले. तनिष्का भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

क्रिएटिव्ह वाईबची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती तेजस्विनी पंडित व संतोष खेर यांची आहे. अंबर विनोद हडपलिखित या चित्रपटाचे दिग्दर्शन देवरूखकर यांनी केले आहे. यामध्ये शिवाजी साटम, अतुल काळे, समीर चौघुले, स्नेहल शिदम यांनीही प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सध्या सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असलेले ‘मी तुला त्या नजरेनं...’ हे गाणे रोहित राऊत आणि ज्ञानदा पवारने गायले आहे. या गाण्याचे बोल सचिन पाठक यांचे, तर संगीत समीर सप्तीसकर यांचे आहे.

हेही वाचा: Nashik News : मीनाताई ठाकरे उद्यानात स्वच्छता मोहीम; उद्यानातील खेळण्यांची लवकरच दुरुस्ती!