बामडोद येथे माऊली माता व हनुमान मंदिराचे भूमिपूजन

बामडोद येथे माऊली माता व हनुमान मंदिराचे भूमिपूजन
Published on: 
(पान ३ ला ॲंकर) फोटो : NSK26H32761 बामडोद : मंदिराच्या भुमिपूजनप्रसंगी उपस्थित डॉ. हीना गावित, डॉ. सुप्रिया गावित आदी. -------------- बामडोद येथे माऊली माता, हनुमान मंदिराचे भूमिपूजन आमदार डॉ. गावितांच्या स्थानिक विकास निधीतून होणार उभारणी सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १७ : माजी आदिवासी विकासमंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात येणाऱ्या बामडोद येथील हनुमान मंदिर व माऊली माता मंदिराचे भूमिपूजन माजी खासदार डॉ. हीना गावित व भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. हीना गावित यांनी सांगितले की, गावाच्या विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. हनुमंत ही बलदेवता आहे. युवकांनी बलउपासना म्हणजे व्यायामावर भर द्यावा. युवकांसाठी गावात व्यायामशाळेचा प्रस्ताव द्यावा. लगेच मंजूर मिळवून आणून देईल, असे आश्वासन त्यांनी दिले. डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या, आपण याच गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी सर्वांनी मला भरघोस मतांनी विजयी केले होते. विकासाला साथ देणाऱ्या मतदारांची काळजी घेऊन गावांतील प्रत्येक समस्या सोडवण्याचे आमचे धोरणच आहे. त्यामुळे घरकुलांचा लाभ सर्वांनाच मिळवून दिला. गावातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करून दिले. सौर लाईट मिळवून दिला. शिव मंदिर बांधून दिले. आता आमदार डॉ. गावित यांच्या निधीतून दोन मंदिरांसाठी निधी मंजूर करून दिला. अनेक योजना आपण या गावाला दिल्या. बामडोद गावाला जोडणारे सर्वच रस्ते डांबरीकरण करून दिले. यापुढेही गावातील समस्या सोडवण्यासाठी आम्ही तत्पर राहू, असे डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, बामडोदचे ग्रामस्थ विलास पाटील, वसंत पाटील, कोळदाच्या सरपंच मोहिनी वळवी, रघुनाथ पाटील, नारायणभाई पाटील, किरण गवळे, उपसरपंच कोळदा, एकलव्य संघटनेचे अध्यक्ष नितेश वळवी, आनंद भील, सुरेश पाटील, वसंत पाटील, सुभाष पाटील, पितांबर पाटील, अनिल पाटील, राजाराम पाटील, समशेरपूरचे सरपंच ब्रिजलाल पाटील, लोणखेडाचे उपसरपंच संजू पाटील, प्रशासक श्री. हिरवाळे, बांधकाम विभागाचे प्रणव पाटील, लोटन भील, नामदेव भिल, अशोक भिल, प्रकाश भील, गजमल भिल, रवींद्र भिल, बचतगटाच्या प्रमुख सुमन पाटील, सुनीता पाटील, मुख्याध्यापक श्री. करनकाळ, अंगणवाडी सेविका सुनीता भिल आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com