धुळे ः टुडे १ साठी, आज मस्ट
--
पेजिनेशनला सूचना ः सेकंडमेन....३१ गुन्हे....या बातमी शेजारी ही बातमी घ्यावी....
--
धुळ्यात आज
‘बंदे में है दम’
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ८ : महाराष्ट्र हरिजन सेवक संघातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त जळगावस्थित परिवर्तन संस्थेतर्फे ''बंदे में है दम'' हा गांधींचा शोध घेणारा आगळावेगळा संगीतमय कार्यक्रम शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी साडेसहाला होणार आहे.
येथील झाशीची राणी पुतळा परिसरातील गरूड बागेलगत बर्वे कन्या छात्रालयात हा कार्यक्रम होणार आहे. महात्मा गांधी यांच्याबद्दल समाजात असलेल्या विविध समज-गैरसमजांचा संगीतमय आणि बौद्धिक शोध या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतला जातो. गाणी आणि रंजक गोष्टींच्या आधारे गांधीजींचे विचार उलगडून सांगणारा हा प्रयोग परिवर्तन संस्थेने तयार केला आहे. हर्षल पाटील यांची संकल्पना, नारायण बाविस्कर यांचे दिग्दर्शन, मंजुषा भिडे व सुदीप्ता सरकार यांचे संगीत दिग्दर्शन आहे. मधुकर शिरसाट, मंगेश कुलकर्णी निर्मिती प्रमुख असून, रंगकर्मी शंभू पाटील हे खुमासदार शैलीत गांधीजींचे विचार रसिकांसमोर उलगडून सांगणार आहेत. हा कार्यक्रम संगीतप्रेमी आणि सर्व रसिकांसाठी विनाशुल्क खुला आहे. धुळेकरांना सहभागाचे आवाहन सेवक संघाचे अध्यक्ष मोहन जोशी, सचिव मधुकर शिरसाट यांनी केले.
--