नाशिक- बांगलादेशी युवतीशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर नाशिकच्या युवकाने मुस्लिम धर्म स्वीकारत तिच्याशी निकाह केला. विशेष म्हणजे, ही युवती बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून ‘श्रेया’ या बनावट नावाने नाशिकमध्ये राहत होती. तिने आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र बनवले आणि गेल्या विधानसभेत मतदानही केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी नाशिकच्या युवकासह बांगलादेशी युवती, तिच्या मामा-मामींना अटक करण्यात आली आहे.