जळगावात आढळली बाग्लादेशी तरुणी

जळगावात आढळली बाग्लादेशी तरुणी
Published on: 
जळगावात आढळली बांगलादेशी तरुणी जयपूरमार्गे दाखल; रेल्वेस्थानकावर चक्कर येऊन पडली अन्‌ अडकली सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : येथील रेल्वेस्थानकावर तरुणी चक्कर येऊन पडली. मात्र, तिच्यासोबत असलेल्या मावशीने तिला सोडून पळ काढला. रेल्वे पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले असता, ती बांगलादेशी असल्याचे आढळून आले. तरुणीला महिला सुधारगृहात रवाना केले आहे. कुटुंबातील दारिद्र्य आणि पैशांची चणचण असल्याने कामाच्या शोधात २५ वर्षीय तरुणी दलालांच्या संपर्कात आली. जयपूर येथे वास्तव्यास असलेल्या तिच्या मानलेल्या मावशीच्या सांगण्यावरून तिने भारतीय सीमेत प्रवेश केला. पश्चिम बंगालमध्ये आल्यानंतर रेल्वेने जयपूर गाठले. तेथे दोन महिने वास्तव्य केल्यानंतर मानलेल्या मावशीसोबत ती रेल्वेने जळगावला आली. मात्र, जळगाव रेल्वेस्थानकावर तिला अचानक चक्कर आल्याने ती खाली कोसळली. रेल्वे पोलिसांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. चौकशीत ती बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले. तिचे नाव मो. अकिजारा अख्तर मो. अबछार अली (वय २५, रा. बगारचर युनियन, पो. भाटखाउरा, बक्षीगंज, विभाग ढाका, जि. जमालपूर, बांगलादेश) असे समोर आले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, सहायक निरीक्षक अनिल वाघ तपास करीत आहेत. दरम्यान, अकिजारा अख्तर हिला तस्करांनी जंगलातून भारतीय हद्दीत आणले. तेथे तारांचे कुंपण किंवा भिंत नव्हती. बांगलादेशातून भारतात प्रवेश केल्यानंतर ती थेट रेल्वेस्थानकापर्यंत पोहोचली. कमी वयाच्या बांगलादेशी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून भारतात आणले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांची बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व अन्य कागदपत्रे तयार केली जातात. नंतर त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जाते. जळगावात यापूर्वी वेश्या व्यवसायावरील दोन कारवायांमध्ये बांगलादेशी तरुणी आढळल्या होत्या. दुभाषिकाच्या मदतीने जबाब पोलिस प्रशासनाकडून आशादीप महिला सुधारगृहाच्या अधिकारी सोनिया देशमुख, शहर पोलिस उपनिरीक्षक सावित्री ढगे आणि दुभाषिक जकिया अबुल खायर पोकी यांच्या मध्यस्थीने रविवारी (ता. ४) संशयित तरुणीचा जबाब नोंदविला. चौकट ना विसा, ना पासपोर्ट तिने भाऊ फराद शेख याच्या मदतीने भारतात प्रवेश केल्याचे सांगितले. भारत प्रवेशासाठी किंवा वास्तव्यासाठी तिच्याकडे कोणताही वैध पासपोर्ट, व्हिसा अथवा कागदपत्रे उपलब्ध नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com