नाशिक- मृतधाम परिसरातील खैरे मळ्यात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी महिलांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक व अंबड पोलिसांच्या पथकाने छापा टाकून अटक केली आहे. या संशयित बांगलादेशींना राहण्यासाठी निवारा देणाऱ्या संशयितालाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.