बनावट सहि शिक्क्याच्या अधारे जिल्‍हाबँक अधिकार्यांशी संगनमत करुन फसवणुक

बनावट सहि शिक्क्याच्या अधारे जिल्‍हाबँक अधिकार्यांशी संगनमत करुन फसवणुक
Published on: 
(फाइलमध्ये दोन बातम्या आहेत) ------ लोगो : मविप्र ताबा प्रकरण --- शीर्षक बँक अधिकाऱ्यांशी संगनमत; बनावट सही-शिक्क्यांनी फसवणूक कथित अध्यक्षांसह दोघांवर गुन्हा दाखल; विजय पाटलांचा जेल मुक्काम वाढला सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीपेठ शाखेत खोटे व बनावट दस्तऐवज व शिक्के आणि खोट्या सह्यांच्या आधारे बेकायदेशीर बँक खाते हाताळून संस्थेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत संस्थेचे मानद सचिव नीलेश भोईटे यांच्या तक्रारीवरून कथित अध्यक्ष विजय भास्कर पाटील (वय ७१, रा. दीक्षीतवाडी), उपाध्यक्ष हेमंत अमृतराव साळुंखे (मुक्ताईनगर, जळगाव) यांच्याविरुद्ध जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. ५) गुन्हा दाखल झाला आहे. धर्मादाय आयुक्त व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संस्थेचे अधिकृत काम भोईटे यांच्या कार्यकारिणीकडे आहे. न्यायालयाने विजय भास्कर पाटील यांना संस्थेच्या कामात हस्तक्षेप न करण्याचे व ताबा न घेण्याचे मनाई हुकूम यापूर्वीच दिल्याने सर्वस्वी कार्यभार नीलेश भोटे व संचालक मंडळाकडून चालविले जात आहे. असे असतानाही १७ जून २०२२ पासून विजय भास्कर पाटील आणि हेमंत अमृतराव साळुंखे यांनी आपसात संगनमत करून कट रचला. आपणच अध्यक्ष व उपाध्यक्ष असल्याचे भासवून जेडीसीसी बँकेच्या नवीपेठ शाखेतील बँक अधिकाऱ्यांशी हातमिळवणी केली. संस्थेचा बनावट शिक्का तयार करून आणि स्वतःचे छायाचित्र लावून बँकेच्या नमुना सही कार्डवर खोट्या सह्या करून त्याचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आले आहे. बँक अधिकाऱ्यांच्या सहभागाचा संशय संशयित हेमंत साळुंखे बँकेच्या जळगाव शाखेतील अधिकारांचा गैरवापर केला. बँकेच्या तत्कालीन शाखाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणतीही शहानिशा किंवा कागदपत्रांची खात्री न करता दोघांना बँक खाते हाताळण्याची, चेकबुक मिळविण्याची बेकायदेशीर परवानगी दिली. या माध्यमातून संस्थेचे मोठे नुकसान व्हावे व स्वतःचा गैरलाभ व्हावा, या उद्देशाने संशयितांनी खोटी प्रोसिडिंग बुक, खोटे ठराव व बनावट अर्ज सादर केले. पोलिसांत गुन्हा दाखल संस्थेच्या नावाने बनावट शिक्के, दस्तऐवज बनवून, उच्च न्यायालयाच्या मनाई हुकूमाचा अवमान करत बँकेतील खात्यांचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाल्याने विद्यमान मानद सचिव नीलेश भोईटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विजय पाटील व हेमंत साळुंखे यांच्याविरुद्ध फसवणूक, खोटे दस्तऐवज, बनावट शिक्के यांचा वापर करून कटकारस्थान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहायक निरीक्षक गोपाळ देशमुख तपास करीत आहेत. --- विजय पाटलांचा पाय खोलात; न्यायालयाने जामीन फेटाळला सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : जिल्‍हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या नावे बनावट लेटर हेड व शिक्के तयार करून शासकीय कार्यालय, विद्यापीठात त्याचा वापर करून शासकीय कार्यालयांची दिशाभूल केल्याप्रकरणी २६ जुलैला दाखल गुन्ह्यात अटकेत असलेल्या विजय पाटील यांच्या वतीने जिल्‍हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते. यावर न्या. खडसे यांच्या न्यायालयात कामकाज होऊन दोन्ही पक्षांचा युक्तिवाद तपासाधिकाऱ्यांचा तपास आणि एकूणच गुन्ह्याचे गांभीर्य पाहता न्यायालयाने ॲड. विजय पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com