नाशिक : बनावट कागदपत्राव्दारे बॅंकेला 28 लाखांचा चुना

bank fraud
bank fraudesakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : शेतकऱ्याने बनावट कागदपत्रांद्वारे (Forged documents) बनवाबनवी करीत पिंपळगाव स्टेट बॅकेकडून (SBI) कर्ज घेत २८ लाख रूपयांना चुना (Fraud) लावला आहे. फसवणूक झालेल्या बॅकेच्या शाखाधिखारी दत्तात्रय टाके यांनी कैलास रामचंद्र खोडे (रा. पिंपळगाव बसवंत) या शेतकऱ्याविरोधात पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहा वर्षानंतर ठकबाजीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. (Bank looted for Rs 28 lakh by forged documents Nashik Crime News)

bank fraud
एकल वापराच्या प्लास्टिकवर 1 जुलैपासून बंदी : जिल्हाधिकारी जलज शर्मा

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार कैलास रामचंद्र खोडे याने स्टेट बॅकेच्या पिंपळगाव बसवंत शाखेतून २०१६ मध्ये शेतीसाठी कर्जप्ररकण सादर केले. बॅकेने कृषीकर्जांततर्गत १४ लाख ८७ हजार रूपये कर्ज मंजूर केले. नंतर खोडे याने पुन्हा १४ लाख रूपयांच्या गृहकर्जाची मागणी केली. असे २८ लाख ८७ हजार रूपये शेती व गृहकर्ज खोडे याने स्टेट बॅकेकडून घेतले. पण या कर्जसाठीचे सातबारा उतारे व इतर दस्ताऐवज बनावट असल्याचे बॅकेच्या अधिकाऱ्यांच्या उशिरा लक्षात आले. बॅकेच्या प्रशासनाने पिंपळगाव पोलिस ठाण्यात कैलास रामचंद्र खोडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपळगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पटारे, कुणाल सपकाळे तपास करीत आहेत.

bank fraud
Nashik : शहरात प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com