Nashik : मुख्य मार्केट यार्ड समोरील वडाचे झाड कोसळले

Banyan Tree Collapsed latest marathi news
Banyan Tree Collapsed latest marathi newsesakal

नाशिक : गेल्या दहा ते बारा दिवसांपासून शहर-परिसरात पावसाची संततधार (Constant rain) सुरू होती. ज्यामुळे नाशकातील अनेक जुने वाडे तसेच जुन्या झाडांच्या (Old Trees Fallen) कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

नाशिक मधील दिंडोरी रोडवरील मुख्य मार्केट यार्ड समोरील असेच एक वडाचे (Banyan Tree) झाड कोसळले. सदर घटना सव्वा अकराच्या सुमारास घडली असून झाड अचानक कोसळले असल्याने एक रिक्षा आणि मोपेड झाडाखाली दबले गेले. (Banyan tree fell in front of main market yard dindori road nashik latest marathi news)

Banyan Tree Collapsed latest marathi news
Nashik : अहवालानंतरच बिटकोत ऑपरेशन थिएटर होणार सुरू

या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसून तीन महिला व रिक्षाचालक थोडक्यात बचावले. झाड कोसळल्याने रिक्षा आणि मोपेडचे मात्र मोठे नुकसान झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

या घटनेनंतर पोलिस लागलीच घटनास्थळी दाखल झाले तसेच त्यांनी झाडा पासून सुरक्षित अंतरावर बेरीकडींग केले. या घटनेमुळे शहरातील जुनाट वृक्षांचा प्रश्न मात्र पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Banyan Tree Collapsed latest marathi news
Nashik : 2 महिन्यात अवघे 18 Black Spot बंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com