धुळे : टुडे पान २ साठी...
--
सद्गुरु बापूजी भंडारी महाराजांचा
१७ नोव्हेंबरला पुण्यतिथी सोहळा
--
पाच दिवसीय सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १ : ब्रह्मलिन श्री सद्गुरु बापूजी भंडारी महाराज यांची ५० वी पुण्यतिथी १७ नोव्हेंबरला होत आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून देवपूरस्थित श्री सद्गुरु बापूजी भंडारी संस्थान यांच्या वतीने १३नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत पाच दिवसीय पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
-
महोत्सवादरम्यान दररोज सकाळी सहाला काकड आरती, सकाळी सातला अभिषेक पुजा व सायंकाळी साडेपाचला हरिपाठ होणार आहे. तसेच, विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये नामजप, सुंदरकांड, भक्तिरंग, प्रवचन, भजन, लघुरुद्राभिषेक, ध्वजारोहण आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ नोव्हेंबरला दुपारी १२:४५ ला संस्थानाच्या कार्याचा आढावा व मान्यवरांचे सत्कार होतील. सायंकाळी सहाला संत भोजन व सभा समाप्त होईल. १४ नोव्हेंबरला सायंकाळी सहाला संस्थानाच्या सभागृहात वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली असून संस्थानाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिलीप देशमुख हे सभेच्या अध्यक्षस्थानी असतील. या सर्व धार्मिक व वार्षिक कार्यक्रमांमध्ये सर्व सभासदांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.