Trimbakeshwar Trusteeship: त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तपदासाठी चढाओढ! मुलाखतीनंतर नियुक्ती होणार

Trimbakeshwar temple
Trimbakeshwar templeesakal

Trimbakeshwar Trusteeship : आद्यज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तपदाच्या चार जागांसाठी १६५ अर्ज नाशिक येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात प्राप्त झाले आहेत. गतकाळच्या विश्वस्तांची मुदत आज संपल्याने नवीन विश्वस्त निवडीसाठी अर्ज मागविण्यात आले असता, या जागेवर आपली वर्णी लागावी, यासाठी मोठी चढाओढ निर्माण झाली आहे.

येत्या १० जुलैपासून त्यासाठीच्या मुलाखती नाशिक येथे होणार आहेत. (Battle for Trimbakeshwar Temple Trusteeship Appointment will be made after interview nashik)

पालिका निवडणुकीच्या धर्तीवर आपल्याला मान मिळावा, यासाठी इच्छुक हरप्रकारे प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. या पदांपैकी तुंगार ट्रस्ट यांचा एक प्रतिनिधी, तर पुरोहित संघाचा प्रत्येकी एक प्रतिनिधी, जिल्हा न्यायाधीश हे चेअरमन व पालिका मुख्याधिकारी हे सचिव व उर्वरित चार प्रतिनिधी बाहेरील व्यक्ती घेण्यात येतात.

देवस्थान ट्रस्टचा कारभार नेहमी चर्चेत राहिला असून, येथील सर्वांचीच रोजीरोटी या देवालयावर अवलंबून असतानाही तेथील काही आर्थिक व्यवहार चर्चिले गेल्याने अनेकांच्या श्रद्धेला ठेच पोचली.

गत पंचवार्षिक व त्याआधीच्या विश्वस्त मंडळाच्या कालावधीत नोकरभरती व वादातीत निर्णय व सततचे वाद देशभर चर्चिले गेल्याने येथे गैरकारभार चालतोय, असा संशयही निर्माण झाला.

या देवस्थानशी निगडित व धार्मिक असा सखोल अभ्यास असणाऱ्या व्यक्तींची निवड येथे झाल्यास चांगले निर्णय घेण्यात येऊन वादातीत विषय टाळले जातील व भाविक केंद्रबिंदू समजून व्यवस्था करण्यात याव्यात, अशी स्थानिकांची मागणी आहे.

येथील धार्मिक प्रथा व परंपरा यांना फाटा देऊन फक्त उत्पन्नाचे साधन म्हणून देखील व्यवहार चालतात. तेही कितपत योग्य आहेत, असेही भाविक विचारणा करतात.

भररस्त्यावर असलेले देणगी दर्शनासाठीचे कार्यालय पश्चिम अथवा पूर्व दरवाजाजवळ केल्यास रस्त्यातील अडचण दूर होईल. इतर देवस्थानांमध्ये यापेक्षा चौपट भाविक गर्दी असूनही दर्शन सुलभ होते, तशी व्यवस्था का होत नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Trimbakeshwar temple
Ration Shop License: रास्तभाव दुकान परवान्यासाठी आवाहन

‘ती’ अनिश्चितता कायम

गतविश्वस्त मंडळाच्या कारकिर्दीत पूर्व दरवाजा दर्शन मंडप व्यवस्था व प्रसाधनगृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. मंदिर गर्भगृह दरवाजाला चांदीचा पत्रा व मंदिरात चांदीची उपकरणे भक्तांद्वारा देणगी स्वरूपात मिळविली.

याच कालावधीत काही कर्मचारी व लेखापाल यांनी चुकीचे निर्णय घेतल्याने येथे चर्चेचा विषय झाला होता. अद्याप येथील नूतनीकरण व सामग्री खरेदीबाबत विश्वस्त मंडळात एकमत नसल्याने रकमा देणे व मंजुरी याबाबतीत अनिश्चितता कायम आहे.

१० पासून मुलाखती होणार

त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या मागील विश्वस्तपदाची नियुक्ती ३ जुलै २०१८ ला झाली होती. तिची मुदत ३ जुलैला संपली आहे. नवीन विश्वस्तपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, १० जुलैपासून इच्छुकांच्या मुलाखती नाशिक येथे सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात होणार आहेत. सर्व मुलाखती व त्यानंतर नूतन विश्वस्त नियुक्त होतील.

Trimbakeshwar temple
Nashik Crime: नाशिकमध्ये बोगस दस्तनोंदणी! जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील प्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com