ब्राम्हणवाडे येथे बीबीएफ तंत्रणाचे बचत गटास मार्गदर्शन कृषी विभागाच्या खेत बचाओ अभियानाला प्रतिसाद

ब्राम्हणवाडे येथे बीबीएफ तंत्रणाचे बचत गटास मार्गदर्शन  कृषी विभागाच्या खेत बचाओ अभियानाला प्रतिसाद
Published on: 
पान-३ अँकर फोटो-23263 ब्राह्मणवाडे ः शेतकऱ्यांना बीबीएफ तंत्रज्ञानाबाबात माहिती देताना कृषितज्ज्ञ. शेजारी बचत गटातील शेतकरी. ब्राह्मणपाडेत ‘बीबीएफ’बाबत बचत गटास मार्गदर्शन कृषी विभागाच्या खेत बचाओ अभियानाला प्रतिसाद सिन्नर, ता. २६ ः राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत ब्राह्रमणवाडे येथे विठ्ठल-रुक्माई नैसर्गिक शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्त्व, जैविक निविष्ठांचा वापर तसेच सोयाबीन पिकातील आधुनिक लागवड तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी गावस्तरीय बैठक व प्रक्षेत्र भेट आयोजित करण्यात आली. या वेळी कृषी संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांनी बीबीएफ व नॉन-बीबीएफ पद्धतीने लागवड केलेल्या सोयाबीन पिकांची पाहणी केली. सहयोगी संसोधन संचालक डॉ. रवींद्र कोळगे, गहू संशोधन केंद्राचे प्रा. भालचंद्र म्हस्के, कांदा व द्राक्ष संशोधन केंद्रातील डॉ. भास्कर पाटील यांनी मार्गदर्शन केले. ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, कृषी अधीक्षक रवींद्र माने, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे, मंडळ कृषी अधिकारी नितीन पगार, उपकृषी अधिकारी रणजीत आंधळे, सहाय्यक कृषी अधिकारी योगिता घोरपडे, तंत्रज्ञान व्यवस्थापक गोकुळ जाधव, पोलिसपाटील कमलाकर रामराजे आदी उपस्थित होते. नैसर्गिक शेतीत जैविक निविष्ठांचे महत्त्व, योग्य वापर, जमिनीचे आरोग्य टिकविणे, सेंद्रिय कर्ब वाढविणे आणि रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नैसर्गिक शेतीत उपलब्ध स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर करून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन करण्यात आले. पथकाने बीबीएफ आणि नॉन-बीबीएफ पद्धतीने लागवड केलेल्या सोयाबीन पिकांची पाहणी केली. दोन्ही लागवड पद्धतींचे निरीक्षण करण्यात आले. प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले. शेतकरी गटांना प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रक्षेत्र भेटीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कृषी विभाग, आत्मा यंत्रणा आणि कृषी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांच्या समन्वयातून शेतकऱ्यांना संशोधनाधारित माहिती मिळण्यास मदत करण्यात येत आहे. .......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com