Demolition Protest
sakal
नाशिक: नगरपालिका काळापासून असलेल्या बी. डी. भालेकर हायस्कूलची इमारत जीर्ण झाल्याने ‘आम्ही पाडणारच असा पवित्रा महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी घेतला, तर शाळा पाडण्यापूर्वी त्या जागेवर शाळाच बांधणार असे लेखी आश्वासन द्या, तोपर्यंत शाळा पाडू नये अशी भूमिका बी.डी. भालेकर शाळा बचाव समितीने घेतली. महापालिकेच्या आडमुठे धोरणाच्या विरोधात मंगळवार (ता. ४) पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.