बीड जिल्ह्यातील केज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेला पहाटेच्या सुमारास जिवंत जाळण्यात आले होते. कोणताही प्रत्यक्ष पुरावा आणि जबाब घेण्यापूर्वीच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सानप यांनी अत्यंत शिताफीने केला. त्यामुळे या गुन्ह्यातील तीनही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली.