फोटो क्रमांक : 33313
बेटावद (ता. शिंदखेडा) : श्री लहान बालाजी संस्थानतर्फे गुरुवारी निघालेला रथ ओढताना भाविक व ग्रामस्थ.
----
‘गोविंदा गोविंदा’च्या गजरात बेटावदला रथोत्सव
--
विधिवत पूजेनंतर मिरवणुकीस प्रारंभ; गावाला यात्रेचे स्वरूप
सकाळ वृत्तसेवा
बेटावद, ता. २२ : येथील लहान बालाजी संस्थानतर्फे गुरुवारी (ता. २२) श्री बालाजींच्या मूर्ती व रथाची विधिवत पूजा भक्तिमय वातावरणात झाली. पूजेनंतर रथाच्या मिरवणुकीस वाद्यांसह सुरुवात झाली. परिसरात व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने गावाला यात्रेचे स्वरूप आले असून, मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पूजेचे पौरोहित्य पुजारी अनंत झारे, मिलिंद पाठक व हेमंत पंचभाई यांनी केले. खासदार डॉ. शोभा बच्छाव, डॉ. दिनेश बच्छाव, शिंदखेड्याच्या नगराध्यक्षा कलावती माळी, श्यामकांत सनेर, मोतीलाल वाकडे, महेश पाटील, संस्थानचे अध्यक्ष महावीर जैन, उपाध्यक्ष वसंतराव माळी, संचालक सदाशिवराव माळी, बापू बागूल, विरेंद्र पवार, सुजीत पवार, श्रीकांत मेटकर, सुनील देशमुख, माजी सरपंच मंगलचंद जैन, अरुण देशमुख, अजंदेचे सरपंच ईश्वर परदेशी, दिनेश माळी, महेंद्र माळी, विजय माळी, ग्रामसेवक प्रमोद खलाणे, रथाचे मानकरी अनिल पाटील, हर्षवर्धन पाटील, देवराम पाटील, बापू धोबी व संतोष कोळी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.