Nashik : वीजबिलासाठी फोन करणाऱ्या भामट्यांपासून सावधान...

Fake MSEDCL Call
Fake MSEDCL Callesakal

नाशिक : वीज भरा अन्यथा वीज जोडणी कट केली जाईल, असा मेसेज वा फोन आल्यास त्या लिंकला वा फोनला प्रत्युत्तर दिल्यास मोठा आर्थिक फटका वीज ग्राहकाला बसू शकतो. वीज कंपनीकडून (MSEDCL) वीज बिलासाठी (Electricity Bill) कोणताही फोन वा मेसेज पाठविला जात नाही. तसेच, अशा आलेल्या मेसेज वा फोनवरील भामट्याच्या सांगण्यासाठी कोणतीही लिंक वा ॲप (Link or App) मोबाईलमध्ये इन्स्टॉल न करण्याचे आवाहन नाशिक सायबर पोलिसांनी वीजग्राहकांना केले आहे. (Beware of scoundrels calling for electricity Nashik News)

गेल्या काही दिवसांमध्ये ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांकडून बनावट मेसेज वीज ग्राहकांना केले जात आहेत. वीजबिल तत्काळ भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यासंदर्भातील मेसेज ग्राहकांना पाठवून फोनवरून संपर्क साधतात आणि त्यांना लिंक वा ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यास सांगितले जाते. त्या लिंकवर प्रतिसाद दिल्यास भामटा ऑनलाइन वीज ग्राहकाचे अकांऊट हॅक करून त्याद्वारे आर्थिक गंडा घातला जात असल्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे अशा कोणत्याही मेसेज, फोन वा लिंकला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Fake MSEDCL Call
शेतकऱ्यांनो फसवे संकेतस्थळ, भ्रमणध्वनीपासून सावध रहा

असा घातला जातोय गंडा

मुंबई नाका पोलिस ठाण्यात रविकांत काळे (रा. बाजार स्ट्रीट, फोर्ट, मुंबई) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी २२ मेस द्वारका चौक ते सीएसएमटी रेल्वे स्थानक, मुंबई असा प्रवास केला. प्रवासादरम्यान, त्यांच्या मोबाईलवर बेस्ट इलेक्ट्रिसिटी द्वारे, वीजजोडणी खंडित करणार असल्याचा मेसेज आला आणि तत्काळ ६२९५८४१२२८ या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले. त्यानुसार, काळे यांनी संपर्क केला असता संशयित दीपक शर्मा नामक व्यक्तीने त्यांना मोबाईलवर टीम व्हीव्हर क्विक सपोर्ट हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. या वेळी संशयिताने दिलेल्या सूचनेनुसार काळे यांनी ॲप डाऊनलोड केले. या वेळी संशयिताने त्यांच्याकडून क्रेडिट कार्डची माहिती घेत ते भरावयास लावली. त्यानुसार त्यांनीही माहिती दिल्यानंतर काही वेळातच काळे यांच्या बँक खात्यातून ९० हजार ३०८ रुपये परस्पर काढून घेत गंडा घातला.

Fake MSEDCL Call
Nashik : पेन्शन अदालतमध्ये 55 प्रकरणे निकाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com