Crime Branch
sakal
जुने नाशिक: भद्रकाली गुन्हे शोध पथकाने कन्नमवार पुलाखाली सापळा रचून नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई केली. त्यास ताब्यात घेत त्याच्याकडून सुमारे ३१ हजार ५०० रुपयांचे ४५ नायलॉन मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले. रहेमान लतीफ खान (वय २४, रा. नाईकवाडीपुरा) असे संशयिताचे नाव आहे. यंदाची शहरातील पहिली कारवाई आहे.