नाशिक- उपवासाला चालणारी व आरोग्यदायी समजली जाणारी भगर (एक प्रकारचे तृणधान्य) आता छत्तीसगड व मध्य प्रदेश येथून तयार स्वरूपात थेट महाराष्ट्रात येऊ लागल्याने नाशिकसह राज्यातील भगर मिल अडचणीत सापडल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत दहापेक्षा अधिक मिल बंद पडल्या, तर सध्या सुरू असलेल्या मिलमध्येही कामगारांना वर्षातून फक्त चार महिने पूर्णवेळ काम मिळते. उर्वरित आठ महिन्यांचे व्यवस्थापन करताना उद्योगपतींची मोठी कोंडी होत आहे.