NSK26H34251
जळगाव : ज्येष्ठ कवी भगवान भटकर यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी वा. ना. आंधळे, डॉ. रफिक काझी, प्रा. देवेंद्र इंगळे, प्रा. सुधीर भटकर, युवराज माळी.
––––
ज्येष्ठ कवी भटकर यांच्या
काव्यसंग्रहांचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १ : आकाशवाणीचे माजी केंद्र निदेशक, ज्येष्ठ कवी व साहित्यिक भगवान भटकर यांच्या ‘कवितेच्या वळणवाटा’ (मराठी काव्यसंग्रह) आणि ‘तुकबंदी’ (हिंदी-उर्दू काव्यसंग्रह) या दोन पुस्तकांचे प्रकाशन रविवारी (ता.१) झाले. अल्पबचत भवन येथे आयोजित सोहळ्यात सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यानंतर ‘कवितेच्या वळणवाटा’ या मराठी काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक व कवी वा. ना. आंधळे यांच्या हस्ते, तर ‘तुकबंदी’ या हिंदी-उर्दू काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी व समीक्षक, कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव डॉ. रफिक काझी ‘राही’ यांच्या हस्ते झाले. मु.जे. महाविद्यालयातील प्रा. देवेंद्र इंगळे अध्यक्षस्थानी होते. तर अथर्व पब्लिकेशनचे संचालक युवराज माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. अशोक पारधे यांनी सूत्रसंचालन केले. तर गौरव हरताळे यांनी आभार मानले.