फोटो-23534
नांदूरशिंगोटे ः क्रांतिवीर भागोजी नाईक स्मारकावर करण्यात आलेली रोषणाई व दीपोत्सव.
भागोजी नाईक स्मारकात
स्वच्छता अभियान
सकाळ वृत्तसेवा
नांदूरशिंगोटे, ता. १५ ः भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त नांदूरशिंगोटे येथील क्रांतिवीर भागोजी नाईक स्मारक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या वेळी दीपोत्सव पार पडला. रोषणाई व दीपोत्सवाने स्मारक परिसर उजळून निघाला.
बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी विचारांचा जागर करत क्रांतिवीर भागोजी नाईक यांच्या ऐतिहासिक कार्याचे स्मरण या वेळी करण्यात आले. सहाय्यक आयुक्त नीलेश अहिरे, प्रकल्पा अधिकारी राजेंद्र महाले, गटविकास अधिकारी अशोक भवारी, ग्रामपंचायत अधिकारी जीवन सावकार आदी उपस्थित होते.
सरपंच शोभा बर्के, उपसरपंच ज्योती शेळके, विनायक आगिवले, आशा आढाव, सरला दराडे, शिवराम शेळके, संजय शेळके, नयना मेंगाळ, योगेश शेळके, सुरेश कुचेकर, सुदाम आव्हाड, अलका पवार, अशोक गवारे, लक्ष्मीबाई नवले, शायरी सय्यद आदी उपस्थित होते. क्रांतिवीर भागोजी नाईक यांचे वंशज अलका पवार, सोनल पवार, सागर पवार, शरद पवार, सनी पवार व शौर्य पवार यांनी सहभाग घेतला.
क्रांतिवीरांच्या स्मृती जतन करणे, त्यांच्या शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाबद्दल अभिमान जागृत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
........