नाशिक- भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून गोवर्धनवासीयांचे रक्षण केले होते. आता सेवेकऱ्यांनी राष्ट्ररक्षणासाठी त्याच गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी २७ जूनपासून होत असलेल्या भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री स्वामी सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी केले.