NMC Senior Citizen Helpline: ज्येष्ठांसाठी लवकरच महापालिकेची हेल्पलाइन : भाग्यश्री बानाईत

IAS Bhagayshree Banayat
IAS Bhagayshree Banayatesakal

NMC Senior Citizen Helpline : शहरातील ज्येष्ठांसाठी लवकरच हेल्पलाइन सुरू करणार आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष क्रमांक उपलब्ध करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत ठरेल अशा स्वरूपाची ही हेल्पलाइन काम करणार आहे.

महापालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री प्रभारी मनपा आयुक्त तथा प्रशासक भाग्यश्री बानाईत यांनी ही माहिती दिली. आगामी काळातील महापालिकेच्या कामकाजातील प्राधान्याचे विषय, महसूल वसुली नवीन उपक्रम याविषयी सोमवारी (ता. ३) त्या विविध दैनिकांच्या संपादकांशी बोलत होत्या. (Bhagyashree Banait statement NMC Senior Citizen Helpline for Senior Citizens Soon nashik)

श्रीमती बानाईत म्हणाल्या, की महसूल वाढीसाठी प्रयत्न करताना मोकळ्या जागांवर पार्किंग विकसित करण्याचे नियोजन आहे. सध्याचे पावसाळी वातावरण लक्षात घेउन महापालिकेतर्फे शहरात २० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे.

महापालिकेच्या या उपक्रमात नागरिकांना सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे. एन कॅम्प उपक्रमात सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. चौक सुशोभीकरणात चौकांच्या ठिकाणी कुंड्यांत शोभीवंत रोपांची लागवड केली जाणार आहे.

सोबतच महापालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने पाच वृक्ष लागवड करून ते दत्तक घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेने करवसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. याअंतर्गत अलीकडच्या ९० दिवसांत ९१ कोटी म्हणजे सरासरी दिवसाला एक कोटी याप्रमाणे करवसुली झाली आहे.

करवसुलीसाठी जनजागृती करण्यासोबतच थकबाकीदारांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत करदात्यांना मोबाईलवर संदेश देण्यात येतो. त्यात, शहरातील २ लाख १६ हजार ६०६ करदात्यांनी प्रतिसाद दिल्याने २०२३-२४ आर्थिक वर्षात ९१ कोटीचा कर वसूल झाला.

पावसाळ्यात जाहिरात होर्डिंगमुळे दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील ८४५ होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यातील १३ धोकादायक होर्डिंग हटविण्यासाठी संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या.

आरोग्य विभागातर्फे संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूचे प्रमाण कमी करीत टीबीमुक्त भारत उपक्रमासाठी अभिनव निक्षय मित्र योजना राबविली जात आहे. १५४ निक्षय मित्रांच्या मदतीने १८७८ रुग्णांना पोषण आहार वितरणाला मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

IAS Bhagayshree Banayat
Shravan: ‘अधिक श्रावणा’चा यंदा 19 वर्षांनंतर दुर्मिळ योग! उपवास व विष्णूला प्रिय विधी करण्यास धार्मिक महत्त्व

सेल्‍फी बायोमेट्रिक प्रणालीत सुधारणा

महापालिकेचे अधिकारी- कर्मचारी वेळेत कामावर येण्यासाठी १ ऑगस्ट २०१४ पासून बायोमेट्रिक पध्दत आहे. त्यात, सुधारणा करताना बाह्य ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेल्फी हजेरी सिस्टीम सुरू करण्यात आली आहे.

विशेषतः पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, सफाई, हजेरी शेड, जलशुद्धीकरण, रुग्णालये आदी ठिकाणी ही प्रणाली कार्यान्वित झाल्याने १५६८ कर्मचाऱ्यांच्या नोंदी ऑनलाइन पद्धतीने नोंदविता येणे शक्य झाले आहे.

दिव्यांगासाठी एज्युकेशन ट्रेनिंग सेंटर

नाशिक पूर्व विभागात दिव्यांगासाठी एज्युकेशन ट्रेनिंग सेंटर उभारण्यात येत असून त्यात, ६५ खोल्या बांधण्यात येतील. दिव्यांगाच्या सुरक्षेसाठी मुंबई आग्रा ते नाशिक पुणे महामार्ग दरम्यान संत सावतामाळी मार्गावर रस्त्याचे काम, धोकादायक वीजेचे खांब, अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शहरात युवकांचा शासकीय कामाचा अनुभव देण्यासाठी स्वच्छ ट्यूलीप इंटर्नशिप अंर्तगत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची निवड करीत १२ उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.

- भाजीपाला क्षेत्र वाढवून महसूल वाढ

- मोकळ्या जागांवर पार्किंग विकसित

- प्रत्येक कर्मचाऱ्याला वृक्ष जबाबदारी

- उत्पन्न वाढीचे इतर स्रोत वाढविणार

IAS Bhagayshree Banayat
Monsoon Health Tips: दुधातून राजगिरा अन् खोबऱ्याचे पदार्थ खात मिळवा ऊर्जा! थंड पाणी टाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com